समुद्रपूर: मगन संग्रहालय व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने फरीदपुर येथे युवती व महिलांसाठी घेण्यात आले रक्त तपासणी शिबिर
गिरड येथील मगन संग्रहालय व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने वआज सोमवारी ३ जुन रोजी फरीदपुर येथिल हनुमान मंदिरात १२ते ४९ वयोगटातील युवती व महिलांसाठी मगन संग्रहालयाचे समन्वय गजानन गारघाटे यांच्या मार्गदर्शनात रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी गावातील युवती व महिलांनी या शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित होऊन आपली रक्त तपासणी करून घेतली या शिबिराला येशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र गिरड येथील प्रज्ञा चांहादे , विष्णू बाम्रणवाडे यांनी सहकार्य केले.