पाटणमध्ये महायुतीचा उमेदवार कोण असावेत, याचा अंतिम निर्णय जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घ्यावा आणि त्यांनी घेतलेला निर्णयच मेढ्यातदेखील लागू होईल,” अशी स्पष्ट भूमिका सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मेढा येथे शनिवारी रात्री साडे आठ वाजता झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मांडली.शिवेंद्रराजेंनी या मेळाव्यात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एकजूट आणि शिस्तीचा संदेश दिला. “महायुती ही केवळ सत्ता मिळवण्यासाठी नाही, तर जनतेच्या विकासासाठीची भूमिका आहे.