तुमसर तालुक्यातील सिहोरा येथून तुमसर येथील फादर एग्नल शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी व्हॅन आज, शनिवार १७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास खैरलांजी जवळ उलटल्याची घटना घडली.तुमसर-बपेरा राष्ट्रीय महामार्गावरील जीवघेणे खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि व्हॅन पलटी झाली. या अपघातात ४ ते ५ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून, त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.प्राथमिक उपचारानंतर सर्व विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले आहे.