घनसावंगी: घनसावंगीत ८५ टक्के खरीप पेरण्या पूर्ण; मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा, १५ टक्के पेरणी अद्याप बाकी..
घनसावंगीत ८५ टक्के खरीप पेरण्या पूर्ण; मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा, १५ टक्के पेरणी अद्याप बाकी.. आज दिनांक 9 गुरुवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यात यंदाच्या पावसाळ्याला सुरुवात होऊन महिनाभर उलटला असला तरी अद्याप समाधानकारक आणि सलग मुसळधार पाऊस झालेला नाही. जून महिन्यात झालेल्या रिमझिम व हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसावरच शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सुमारे ८५ टक्के पेरण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र उर्वरित १५ टक्के क्षेत्रातील पेरणी अजूनही पावसा