कराड: कराड दक्षिण मतदारसंघ बोगस मतदान प्रकरणी प्रशासनाचे दुर्लक्ष; दिवाळीची पहिली आंघोळ प्रशासनाच्या दारात करणार : गणेश पवार
Karad, Satara | Oct 19, 2025 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये कापील येथे बोगस मतदान होऊन देखील प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही, अगदी प्रांताधिकार्यांवर देखील कारवाई होत नाही. एकूणच प्रशासनाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार हे आता सोमवारी अभिनव पद्धतीने आंदोलन करणार आहेत. सकाळी पावणेदहा वाजता दिवाळीची पहिली अंघोळ ते प्रशासनाच्या दारात करणार आहेत, असा इशारा त्यांनी दिला आहे. रविवारी सायंकाळी साडेसात वाजता त्यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली.