महागाव: तालुक्यातील वागद इजारा येथे शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी करत सरकारचा नोंदवला निषेध
महागाव तालुक्यातील वागद इजारा येथे आज दि. २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या धोरणांचा निषेध करत “काळी दिवाळी” साजरी केली. शेतकऱ्यांनी काळ्या पट्ट्या बांधून आणि काळे झेंडे दाखवून आपला संताप व्यक्त केला. यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे चार लाख हेक्टरवर शेतीचे नुकसान झाले असून, पिकांचा मोठा नाश झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूर्वी मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असे आश्वासन दिले होते.