महागाव: गोवंश मासची वाहतूक करणाऱ्यावर एलसीबीची कार्यवाही, पेढी पोखरी गावाजवळ ११० किलो गोमांस जप्त
महागाव पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान एलसीबी पथकाने गोपनीय माहितीवरून शेख अकील शेख मिरांजी रा. पेढी ईजारा याला ११० किलो गोमांस सह आज दि. १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान अटक केली. सविस्तर असे की शेख अकील शेख मिरांजी आपल्या चारचाकी वाहनातून गोवंश मासची वाहतूक करत असल्याची माहिती मिळतास पथकाने पेढी पोखरी रोडवर सापळा रचून वाहन क्रमांक एमएच ०५ एजे ६५२१ थांबवले असता तपासणीदरम्यान ११० किलो गोवंश मास मिळुन आला.