सातारा: सातारा शहरांतर्गत प्रवास आता सोईस्कर; रिक्षा वाहतुकीसाठी नवीन दरांना आरटीओने दिली मान्यता, प्रवाशांमध्ये समाधान
Satara, Satara | Oct 18, 2025 सातारा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या दि. १७ ऑक्टोबर रोजी सातारा येथे झालेल्या विशेष बैठकीत तीन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. महाबळेश्वर-पाचगणी या पर्यटनस्थळांच्या टॅक्सी भाडेदरात वाढ करण्यात आली असून, सातारा शहरासाठी 'पॉईंट टू पॉईंट' ई-रिक्षा सेवेला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. जिल्हा माहिती कार्यालयाकडून शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे.