ठाणे: मानपाडा येथील राजमाता जिजाऊ उद्यानाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Thane, Thane | Oct 20, 2025 ठाणे शहराच्या मानपाडा परिसरामध्ये भव्य असे उद्यान उभारण्यात आले आहे. त्या उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केलेली आहे त्यामुळे राजमाता जिजाऊ उद्यान तसेच ऑक्सिजन पार्क असे नाव या उद्यानाला देण्यात आले आहे. सर्व सोयीसुविधांनी उपलब्ध असलेल्या या उद्यानाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश मस्के आदी उपस्थित होते.