नागपूर शहर: नागपूरच्या ईश्वरी पांडेने पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार केली; ठरली जगातील पहिली पूर्णपणे नेत्रहीन जलतरणपटू
अंधारावर मात करत ध्येयाचा प्रकाश शोधणाऱ्या नागपूरच्या १७ वर्षीय ईश्वरी पांडे हिने ६ एप्रिल रोजी जलतरण क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे. श्रीलंकेतील उर्मलाई पॉइंट ते भारताचे धनुषकोडी हे २९ किलोमीटरचे अंतर यशस्वीपणे पार करत ईश्वरी 'पाल्कची सामुद्रधुनी' पोहणारी जगातील पहिली पूर्णपणे नेत्रहीन जलतरणपटू ठरली आहे.ईश्वरीने श्रीलंका येथील तलाईमन्नारच्या उर्मलाई पॉइंट येथून आपल्या मोहिमेला सुरुवात केली.