खालापूर: खालापुरात रा.जि.प.च्या शाळांचा कंठ दाटण्याची शक्यता
खालापूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. एकेकाळी विद्यार्थ्यांच्या गजबजाटाने निनादणान्या या शाळा आज ओस पडताना दिसत आहेत. इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या आकर्षणामुळे मातृभाषेतील शिक्षणाचा पाया डळमळीत होत चालला असून यावर वेळीच उपाययोजना न राबल्यास मराठी शाळेचे अस्तिव धोक्यात येईल अशा परिस्थितीकडे वाटचाल असल्याचे चित्र तालुक्यातील जि. प. शाळांवर आहे.