नागपूर शहर: सीताबर्डी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: हरवलेले ५५ मोबाईल शोधून मालकांच्या स्वाधीन: सुहास राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक
सीताबर्डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास राऊत यांनी 13 जूनला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार सीताबर्डी पोलिसांनी एका विशेष मोहिमेअंतर्गत नागरिकांचे हरवलेले तब्बल ५५ मोबाईल फोन शोधून काढण्यात मोठे यश मिळवले आहे. तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईलच्या 'आयएमईआय'नंबरचा अचूक वापर करून पोलिसांनी या मोबाईलचा माग काढला. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास राऊत यांनी दिली आहे.