जालना: अंबड चौफुली ते मंठा चौफुली दरम्यान इसमास पुन्हा लुटले; रिक्षातून लुटमारीच्या घटना वाढल्या; यापूर्वी वकीलालाही लुटले होते
Jalna, Jalna | Mar 31, 2026 जालना शहराच्या अंबड चौफुली ते मंठा चौफुली दरम्यान रिक्षातून प्रवास करताना एका वृद्ध शेतकर्याची रोकड व कागदपत्रे चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेच्या आधी एका महिलेला आणि एका वकीलालाही लुटल्याची घटना घडली होती. मंगळवार दि. 31 मार्च 2026 रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणामुळे शहरात पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को येथील रहिवासी एकनाथ रामभाऊ बेडके हे आपल्या मुलीला भेटून परत गावाकडे जात होते.