जालना: दुष्काळाची छाया असतानाही जामवाडीत उत्साहात बैलपोळा साजरा
शेतकऱ्यांनी बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य देत व्यक्त केली कृतज्ञता
Jalna, Jalna | Sep 10, 2026 दुष्काळाची छाया आणि पावसाने पाठ फिरवलेली परिस्थिती असतानाही जामवाडी येथे सालाबादप्रमाणे यंदाही बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेतीच्या कामात वर्षभर आपल्या सोबत राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी बैलांना सजवून त्यांची पूजा केली. तसेच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून त्यांच्याप्रती आपली भावना व्यक्त केली. यंदा पावसाअभावी शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे पोळ्याच्या दिवशी तरी पावसाने हजेरी लावावी आणि ‘किमान बैलांचे शिंग तरी ओले व्हावेत’ अशी आस शेतकऱ्य