प्रहार दिव्यांग आंदोलनाचे संयुक्त विद्यमाने आज दिनांक 31 डिसेंबरला बारा वाजता वरुड येथील कोल्हे सभागृहात भव्य दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिव्यांग बांधवांना साहित्य वितरण करून, दिव्यांगांची आरोग्य तपासणी, दिव्यांग वर वधू परिचय नोंदणी, युडी आयडी कार्ड बाबत ऑनलाईन नोंदणी, तसेच दिव्यांग वित्त महामंडळाचे अंतर्गत असलेल्या योजनांबाबत माहिती देण्यात आली. निळकंठराव यावलकर यांचे सहित अनेक मान्यवरांची उपस्थिती असल्याचे दिसून आले