लातूर: छऱ्याची बंदूक, कोयता घेऊन गंजगोलाईत दहशत; गांधी चौक पोलिसांची फिल्मी धडक कारवाईशहरात ‘गन-कोयता’चा थरार
Latur, Latur | Sep 22, 2025 लातूर : बसस्थानक व गंजगोलाई परिसरात रविवारी (21 सप्टेंबर) लोखंडी कोयता आणि छऱ्याची बंदूक घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला गांधी चौक पोलिसांनी थरारक पद्धतीने पकडले.गांधी चौक पोलीस ठाण्याला माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी लाल रंगाच्या यामाहा R-15 वरून फिरत असलेला तरुण हातात छऱ्याची बंदूक व कमरेला लोखंडी धारदार कोयता घेऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करताना पोलिसांच्या तावडीत सापडला.