घनसावंगी: सततच्या लोडशेडिंगविरोधात शेतकऱ्यांचा संताप; महावितरण कार्यालयात आंदोलन, कीटकनाशक पिण्याचा प्रयत्न
घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली परिसरातील शेतकऱ्यांनी सततच्या लोडशेडिंगविरोधात आज आक्रमक पवित्रा घेत थेट महावितरणच्या उपविभागीय कार्यालयावर धडक दिली. शेतीसाठी आवश्यक वीजपुरवठा वेळेवर मिळत नसल्याने आणि नैसर्गिक आपत्ती व पावसाने दडी मारल्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा संताप आज आंदोलनाच्या रूपाने व्यक्त झाला. धर्मवीर सामाजिक क्रांतीचे प्रांताध्यक्ष रामभाऊ घोगरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने महावितरण कार्यालयात दाख