नागपूर शहर: भरधाव ई-बसने दुचाकीला चिरडले; अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
नागपूर शहरातील सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भीषण अपघातात ४५ वर्षीय दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला.मयत रितेश पुंडलीकराव सातपुते हे आपल्या मोटारसायकलवरून सिताबर्डी भागातील प्रिन्स सावजी भोजनालयाच्या विरुद्ध बाजूने, मेट्रो पिल्लर क्रमांक २१५ जवळून जात होते. दरम्यान, मागून भरधाव आणि निष्काळजीपणे आलेल्या ई-बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.या अपघातात रितेश सातपुते हे गंभीर जखमी झाले.