यावल: साकळी गावातील भवानी पेठ भागातून ३० वर्षीय महिला झाली बेपत्ता, यावल पोलीस ठाण्यात नोंदवली हरवल्याची तक्रार
Yawal, Jalgaon | Oct 17, 2025 यावल तालुक्यातील साकळी या गावात भवानी पेठ आहे. येथील रहिवाशी पूजा लखन बेलदार वय ३० ही महिला आपल्या घरात सांगून गेली की मी माझी मावशी मुक्ताईनगर येथे आजारी आहे तिला पाहून येते. असे सांगून घराच्या बाहेर गेलेली महिला नंतर घरी परत आलीच नाही तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.