मुर्तीजापूर: त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे पत्रकारांचे निषेध व निवेदन
शनिवार २० सप्टेंबर २०२५ रोजी पत्रकार योगेश खरे,अभिजीत सोनवणे,किरण ताजने हे त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्र जवळील पार्किंग मध्ये बातमी संकलनासाठी गेले असता त्यांना काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावर दगडफेक व लाथा बुक्क्यांनी हल्ला केला भविष्यात पत्रकारांवर हल्ले होऊ नये यासाठी बुधवार २४ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सदर घटनेचा निषेध व्यक्त करून उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्री महोदयांना येथील पत्रकारांनी दिले दोषींवर कारवाईचे निवेदन.