ठाणे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑस्ट्रेलियन पाहुण्यांना दिली चक्क वडापावची मेजवानी
Thane, Thane | Sep 16, 2025 ऑस्ट्रेलियाचे माजी परराष्ट्र मंत्री कथा खासदार टीम वॅट्स यांनी आज दुपारी मंत्रालयामध्ये कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शेती,औद्योगिक तंत्रज्ञान,शिक्षण आदी क्षेत्रांमध्ये वाणिज्यिक संबंध दृढ करण्याबाबत चर्चा झाली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे स्वागत करून मुंबईची ओळख असलेला वडापाव त्यांना आग्रहांना खाऊ घालत मेजवानी दिली.परदेशी पाहुण्यांनी देखील वडापावचा आनंदानेआस्वाद घेतला