नागपूर शहर: गृहमंत्र्याच्या गृहजिल्ह्या हादरला,नंदनवनमध्ये जुन्या वादातून गुंडाची गेम; १० तासांत दुसरी हत्त्या
उपराजधानी नागपूरमध्ये गुन्हेगारांचे मनोबल कमालीचे वाढले असून, शहरात रक्ताचा पूर वाहताना दिसत आहे. नागपूरच्या नंदनवन झोपडपट्टी परिसरात जुन्या वैमनस्यातून एका कुख्यात गुन्हेगाराची धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. संजय उर्फ मोनु दुर्गाप्रसाद ठाकूर वय ३२ वर्ष असे मृत गुंडाचे नाव आहे.