नागपूर शहर: खळबळजनक! न्यूरॉन हॉस्पिटल मध्ये डॉक्टर ने केली आत्महत्या : साईनाथ रामलोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक
धंतोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साईनाथ राम लोड यांनी 22 जूनला रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील सुप्रसिद्ध न्यूरॉन हॉस्पिटल मध्ये एका डॉक्टरनेच आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. याप्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून डॉक्टरने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले याबद्दलचा अधिक तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक साईनाथ रामलोड यांनी दिली आहे.