नागपूर शहर: नागपुरात बोगस शाळांचा सुळसुळाट! विनापरवाना दोन शाळांचा भांडाफोड; विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेला एक मोठा गोरखधंदा उघडकीस आला आहे. रहमतनगर-वांजरा परिसरातील दोन शाळा चक्क कोणत्याही शासकीय परवानगीशिवाय सुरू असल्याचे जिल्हा परिषदेच्या चौकशीत निष्पन्न झाले असून, यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत गौसिया आणि जुबेदा या दोन शाळा संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.