नागपूर शहर: मानव-वन्यजीव संघर्षावर वनमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक; 'अर्बन नक्षल'वाद्यांच्या हालचालींवर राज्यमंत्र्यांचा कडक इशारा
राज्यात वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षापासून ते राजकीय वादांपर्यंतच्या विविध विषयांवर राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी वन विभाग, आदिवासी भागातील अपप्रचार आणि ई़डी कारवाईवर महत्वपूर्ण भाष्य केले.