जुन्या वादातून एकाने चाकुहल्ला करुन इसमास जखमी केल्याची घटना माजरी येथे दिनांक १५ रोज सोमवारला दुपारी ४ वाजताच्या सुमारास माजरी येथे घडली.याप्रकरणी माजरी पोलीसांनी गोपी मलय्या डांबरगुंटा.राहणार माजरी याला अटक केली आहे. माजरी येथील धिरज तिवारी हे गावातील एका वाशिंग सेंटरवर बसलेले असतांना आरोपी तेथे आला व भावाबरोबर झालेल्या वादाचा जाब विचारत त्याने तिवारी यांचेवर चाकुहल्ला केला.