नागपूर शहर: गंगा जमुना परिसरात देहव्यापाराचा पर्दाफाश : दर्शन पाटील पोलीस निरीक्षक
पोलीस निरीक्षक दर्शन पाटील यांनी 3 जुलैला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार,गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने गंगा जमुना परिसरात छापा टाकून देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मुन्नीबाई सुरेश कालखोर (६५) ही महिला पैशांचे आमिष दाखवून महिलांकडून देहव्यापार करून घेत होती. पोलिसांनी पीडित महिलेची सुटका केली असून, लकडगंज पोलीस ठाण्यात आरोपी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक दर्शन पाटील यांनी दिली आहे.