नागपूर शहर: विहिरीत गाडी कोसळून झालेल्या अपघातावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले दुःख; तातडीने ऑडिटचे आदेश
नाशिकमध्ये विहिरीत गाडी कोसळून झालेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. या भीषण अपघातात लहान मुलांसह काही जणांचा मृत्यू झाला असून, ही घटना मन सुन्न करणारी असल्याचे फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.