हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपळा फाटा येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत कत्तलीसाठी नेली जाणारी २९ गोवंशीय जनावरे जप्त करण्यात आली आहेत. १९ आणि २० मे च्या मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.संशयावरून एक १२ चाकी ट्रक थांबवण्याचा इशारा केला असता, चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.