महागाव: तालुक्यातील मुडाणा येथे जुन्या पैशाच्या वादातून एकास मारहाण, महागाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल
महागाव तालुक्यातील मुडाणा येथे जुन्या पैशाच्या वादातून मारहाणीची धक्कादायक दि. १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घटना घडली. माथेरान विष्णू पवार वय ३७ वर्ष रा. बेलदरी यांनी कुंडलिक राठोड यांच्याशी वाद घालत फायटर सारख्या वस्तूने पायावर वार करून त्यांना जखमी केले. या घटनेत कुंडलिक राठोड हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमीचा मुलगा ऋषिकेश कुंडलिक राठोड (रा. कोजरी) याने दि. १९ ऑक्टोबर सायंकाळी ५:३० वाजताच्या दरम्यान महागाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.