नागपूर शहर: दिवसाढवळ्या गजानन महाराज मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला; कटर घेऊन आलेला चोरटा पसार, बघा सिसिटीव्ही फुटेज
नंदनवन येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात सोमवारी दुपारी चोरीचा एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला. दुपारी ३:१८ च्या सुमारास एका चोरट्याने मंदिरात प्रवेश करून कटर ग्राइंडरच्या साहाय्याने दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला.सुमारे एक तास कटरने पेटी कापण्याचे प्रयत्न करूनही तो अपयशी ठरला. अखेर घाबरलेल्या चोरट्याने तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट ४ चे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली