जालना: अनधिकृत अतिक्रमण न हटविल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण; महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतरही अतिक्रमण कायम
Jalna, Jalna | Sep 30, 2026 अनधिकृत अतिक्रमण काढून घेण्याचे आदेश जालना शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिल्यानंतरही संबंधित अतिक्रमण अद्याप कायम असल्याचा आरोप करत तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अतिक्रमण न हटविल्याने शेख महेबुब कुरेशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केलंय. निवेदनानुसार, गणेश लुटे यांनी केलेल्या अतिक्रमणाबाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्तांनी संबंधित अतिक्रमणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.