नागपूर शहर: नागपूर हादरले! शोभायात्रेतून बेपत्ता असलेल्या १४ वर्षीय अथर्वचा निर्घृण खून; पोत्यात आढळला मृतदेह
हनुमान जयंतीच्या उत्सवाच्या वातावरणात नागपुरात एक खळबळजनक घटना घडली आहे. गिट्टी खदान हद्दीतून शोभायात्रेदरम्यान बेपत्ता झालेल्या अथर्व नानोरे वय १४ वर्षे या बालकाचा मृतदेह आज भरतवाडा परिसरात संशयास्पद स्थितीत आढळल्याने संपूर्ण शहरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत सहभागी झाला होता, तिथूनच तो बेपत्ता झाला होता.