नागपूर ग्रामीण: दत्ता मेघे नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन; हॉल तिकीट न मिळाल्याने संताप
11 जुलैला दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार दत्ता मेघे कॉलेज ऑफ नर्सिंग प्रशासनाने विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट देण्यास नकार दिल्याने बुधवारी कॉलेजमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली. परीक्षेच्या चिंतेने ग्रासलेल्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट प्राचार्य कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.