लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला लातूर शहरातील ऐतिहासिक गंजगोलाई भागात भक्तीमय आणि उत्साही वातावरण पाहायला मिळालं. सोमवारी रात्री सव्वा अकरा वाजेपर्यंत गंजगोलाई परिसर फुलांच्या सुगंधाने दरवळला होता. व्यापाऱ्यांनी आपल्या स्टॉलवर विविध रंगांची फुलं सजवली होती आणि भाविकांनी देवी लक्ष्मीच्या पूजनासाठी ही फुलं विकत घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.फुलांचा दर यंदा सव्वा किलोसाठी १०० रुपयांपर्यंत पोहोचला होता.