समुद्रपूर: राळेगाव येथे शेतातील बंड्याला आग, आगीत २० क्विंटल कापूस जळून खाक; जवळपास ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान
राळेगाव येथे आज पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास शेतकरी रामदास उमरेडकर यांच्या शेतातील गोठ्याला अचानक आग लागली पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण करून संपूर्ण बंडा आपल्या कवेत घेतला घटनेची माहिती शेतकऱ्यांनी सहकार नेते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड सुधिरबाबू कोठारी यांना देताच त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती व नगरपरिषद हिंगणघाट या दोन्ही अग्नी शामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या आगीत शेतकऱ्याचे जवळपास ४ ते ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.