समुद्रपूर: क्षयरोग मुक्त गाव करणाऱ्यांसाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे: गटविकास अधिकारी दुबे: टिबीमुक्त ८ ग्रामपंचायत सन्मानित
जागतिक क्षयरोग दिनाच्या औचित्यावर समुद्रपुर पंचायत समितीच्या सभागृहात टिबीमुक्त ग्रामपंचायत पुरस्कार वितरण वितरण समारंभांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गटविकास अधिकारी रोशन कुमार दुबे याच्या हस्ते मोहगांव,नंदपुर, विकणी, आसोला, मांडगाव, उंदिरगाव, फरीदपूर वासी, या ८ ग्रामपंचायतीला टिबीमुक्त ग्रामपंचायत म्हणून घोषित करून राष्टपिता महात्मा गांधी याची प्रतिमा व सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले.