कंधार: कंधार ते लोहा मार्गांवरील मुखेड फाट्याजवळ दोन दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू तर एकजण जखमी
Kandhar, Nanded | Sep 16, 2025 दि.15 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:30 ते 7 च्या दरम्यान लोहा ते कंधार जाणाऱ्या रोडवर मुखेड फाट्याजवळ कंधार कडून येणारी स्कुटी क्र. MH-26-CT-0026 चा वाहनचालक हा कंधारकडून विरुद्ध दिशेने येत मोटर सायकल क्र. MH-26-CN-4214 यास धडक दिली होती यात संजय रोहिदास जोंधळे वय 36 वर्ष रा. शिवाजी चौक कंधार व शेख तोफिक रफिक शेख वय 17 वर्ष रा. आसान नगर कंधार ह्या या दोघांचा मृत्यू झाला होता तर दगडू विठ्ठल वाघमारे वय 50 वर्ष रा. गोगदरी ता. कंधार हे गंभीरच्या जखमी झाले होते.