नागपूर शहर: जुन्या वादातून तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला,आरोपीना अटक: विजय दिघे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
गिट्टी खदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे यांनी 27 मे ला रात्री 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार,गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हाडा कॉलनी परिसरात डीजे वाजवण्याच्या जुन्या वादाचा निपटारा करण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. आरोपींनी तरुणावर ६ वार केले असून, यात तो गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना देखील अटक केली आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे यांनी दिली आहे