नागपूर शहर: अग्निशमन सेवा अधिक सक्षम करणार; शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा मनपाकडून सत्कार
शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन सेवा अधिक बळकट करण्यात येईल, असे प्रतिपादन महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी केले. मनपा मुख्यालयात आयोजित 'राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस' कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी महापौरांनी शहीद जवानांना अभिवादन करून त्यांच्या स्मृतीला वंदन केले. शहरासाठी २२ अग्निशमन केंद्रांचा मास्टर प्लान तयार असून, विभागात लवकरच मनुष्यबळ भरती करून विभाग अधिक सक्षम केला जाईल.