महागाव: काळी दौ. परीसरात अवैध रेती वाहतुक करणारे २ ट्रॅक्टरसह ८ लाख ७८ हजाराचा मुद्देमाल जप्त, आरसीपी पथक व वनविभागाची कार्यवाही
महागाव तालुक्यातील काळी दौलत परिसरात अवैध रेती वाहतुकीवर आरसीपी पथक व वनविभागाने सलग दोन कारवाया करत तब्बल ८ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही कारवायांत दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले असून आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. २७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी आरसीपी पथकाने काळी दौलत-साई मार्गावरून अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर क्र. एमएच-२९ बीपी-६०१७ पकडला. यातून ५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.