नागपूर शहर: मानकापूर हद्दीत घरी विक्रीसाठी दारूचा साठा करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
30 मे ला रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे मानकापूर हद्दीत नागबरड येथे घरी विक्रीसाठी दारूचा साठा करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान छापा मार कार्यवाही करून ही कार्यवाही केली आहे. आरोपीचे नाव आदित्य जाधव असे सांगण्यात आले असून त्याच्याकडून देशी दारूच्या दहा बॉटल जप्त करण्यात आल्या आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.