तिरोडा: कुंभारे लाॅन तिरोडा येथे तिरोडा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
Tirora, Gondia | Oct 14, 2025 आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज तिरोडा येथील कुंभारे लॉन येथे तिरोडा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात पार पडली. या बैठकीदरम्यान निवडणुकीसाठीची रणनिती, संघटनात्मक बांधणी तसेच आगामी निवडणूक प्रक्रियेतील विविध नियोजनाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान आगामी निवडणुकीत पक्ष अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.