औंढा नागनाथ तालुक्यातील काठोडा तांडा येथे नागोराव सदाशिव चव्हाण यांनी स्वखर्चातून उभारलेल्या धर्म शाळेचे दिनांक सात डिसेंबर शनिवार रोजी रात्री साडेसात वाजे दरम्यान मान्यवरांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांची प्रतिमा पूजन करून व फीत कापून उद्घाटन करण्यात आले.यावेळी शिरला येथील सरपंच नवनाथ कुऱ्हे पाटील, काठोडा तांडा येथील सरपंच अंबादास राठोड, ठाकरे शिवसेनेचे प्रेम स्वामी, गणेश महाराज राठोड, धर्मशाळेचे अध्यक्ष नागोराव चव्हाण, यश राठोड उपस्थित होते