आज रविवार 18 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तथा पालकमंत्री संजय शिरसाठ यांची मुलगी हर्षदा संजय शिरसाठ यांच्यासह तलवार फिरवणारा आरोपी अभिजीत देविदास जीवनवाल, राजू मानसिंग राजपूत, श्रीमती छाया विजय वाघचौरे या चौघांना आरोपीं विरुद्ध वेदांतनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.