उरण नगर परिषद निवडणुकीत सातत्याने ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा निवडणूक निर्णय अधिकारी वर्गाने त्याकडे कानाडोळा केला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील 10 नंबर प्रभागातील नेहा ठाकूर या 21 वर्षीय मतदार युवतीच्या नावाने ती मतदार केंद्रात पोहोचण्या आधीच कुणीतरी तिच्या नावाने मतदान करून गेल्याची सनसनाटी घटना घडली आहे. या युवतीने मतदान केंद्रात धिंगाणा घातल्यावर शेवटी त्या युवतीला बॅलेट पेपरवर मतदान करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र असे असले तरीही त्या मुलीच्या नावाने मतदान करून गेलेली ती अन्य तरुणी कोण याबद्दल प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.