पनवेल: खोणी-तळोजा मार्गावर जीवघेणी प्रवासी वाहतूक
Panvel, Raigad | May 26, 2026 कल्याण-नगर महामार्गावरील रायते पुलावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि वाहतूक विभागाने काही दिवस धडाकेबाज कारवाईचा दिखावा केला होता. बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी, दंडात्मक कारवाई आणि नियमभंग करणाऱ्या चालकांवर कारवाईची मोहीम राबविण्यात आली होती. मात्र काही दिवसांनंतर ही मोहीम थंडावल्याचे चित्र असून, पुन्हा एकदा रस्त्यांवर जीव धोक्यात घालणारी वाहतूक सुरू झाली आहे.