नागपूर शहर: सक्करदरा परिसरात कार डेकोरेटर्सच्या दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान
सक्करदरा फायर स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आशीर्वाद नगरमध्ये आज पहाटे एका कार डेकोरेटर्सच्या दुकानाला भीषण आग लागली. ही घटना पहाटे ४:४२ वाजताच्या सुमारास 'एच.बी.टी. कार डेकोरेटर्स' या दुकानात घडली.प्राथमिक तपासानुसार, डी.पी. बॉक्समध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले.