नवी मुंबईच्या सीवूड्स परिसरातील सेक्टर क्रमांक 42 येथील संगम गोल्ड नावाच्या सोन्याच्या दुकानांमध्ये 22 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास दिवसाढवळ्या दरोडा टाकण्यात आला. दुकान मालकाच्या डोक्यावर बंदूक ठेवून दरोडा टाकला आणि अख्ख दुकान लुटलं. त्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी पथके तैनात केली. मात्र दरोडा टाकत असतानाचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे