लातूर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आज, सोमवार 10 नोव्हेंबरपासून अधिकृतपणे सुरू झाली. मात्र पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी एकही अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती मिळाली आहे. अहमदपूर, निलंगा, औसा, उदगीर या नगरपरिषदांसह रेणापूर नगरपंचायतीत अर्ज दाखल करण्यासाठी संबंधित तहसील कार्यालये व नियुक्त अर्ज स्वीकार केंद्रे सज्ज ठेवण्यात आली होती.